क्षय रुग्णांना पूरक पोषण आहार किटचे वाटप; सेलू उपजिल्हा रुग्णालयात कार्यक्रम
सेलू : उपजिल्हा रुग्णालयात १४ निक्षय मित्र यांच्या वतीने २८ क्षयरुग्णास पूरक पोषण आहार किटचे सोमवारी,२६ जून रोजी वाटप करण्यात आले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के.पी.चौधरी निक्षय मित्र तथा मुख्याध्यापक मधुकर काष्टे गायकवाड विस्तार अधिकारी श्री. देशमुख, श्री वाघमारे, अंकुश जुमडे, राम पवार, श्री कायंदे, रावसाहेब क्षीरसागर, रेणुकादास जोशी, नवीद शेख, अरुण कडपे, राजकुमार सूर्यवंशी, दीपाली कदम आदींची उपस्थिती होती.