आषाढी एकादशी : सेलूतील नूतन कन्या शाळेची ज्ञानदिंडी उत्साहात; पावली; फुगड्यांनी वेधले लक्ष 

आषाढी एकादशी : सेलूतील नूतन कन्या शाळेची ज्ञानदिंडी उत्साहात; पावली; फुगड्यांनी वेधले लक्ष 

सेलू : आषाढी एकादशी निमित्ताने सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या वतीने ज्ञानदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुख्मिनी आणि विविध संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी लक्ष वेधले. विठू माऊलीच्या गजरात, टाळ, मृदंग, पावली, फुगड्यांनी दिंडीत चैतन्य भरले.

या प्रसंगी रामराव गायकवाड, अशोक उफाडे, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. मानले. बालवारकर्‍यांसाठी सुधाकर पवार आणि मोरे यांनी फराळाची व्यवस्था केली. यशस्वीतेसाठी शशिकांत देशपांडे, किशोर ढोके, नागेश देशमुख, यशवंत कुलकर्णी, सुहास देऊळगावकर, सुनील मोगल, शंकर बोधनापोड, बाबासाहेब थोरे, कैलास मलवडे, विनोद शिंदे, गोविंद शिंदे, सुषमा दामा, वैशाली चव्हाण, सुरेखा आगळे, सीमा सूक्ते, विजया खडके, पूजा महाजन, उपेंद्र दिवाळकर, अनंत बोराडे, बालाजी देऊळगावकर,रामेश्वर काळे, भागूबाई काळे, बेबी हेलसकर, वंदना वाव्हळ यांनी पुढाकार घेतला.


बाळगोपाळांच्या दिंड्यांनी सेलूनगरी दुमदुमली

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!