आषाढी एकादशी : सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या पालखी मिरवणूक; देखाव्यांनी वेधले लक्ष
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी, २९ जून रोजी शालेय पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आली. सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ. रामराव रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, डॉ.आदित्य, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, करणसिंग चव्हाण उपस्थित होते. यानिमित्ताने सकाळपासूनच चिमुकल्या वारकर्यांची लगबग शाळेत होती. पंढरपूरच्या वारीप्रमाणे भक्तिमय वातावरणाचा मुलांनी अनुभव मिळाला. दिंडीत विठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांची वेशभूषा देखाव्यातून साकारली होते. दिंडीतील विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी फराळाचे वाटप केले. विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा मोठा सहभाग होता.