चला घडवूया, मुलांचे आयुष्य; श्रीराम प्रतिष्ठानचा सेलूतील पालकांसाठी आज कार्यक्रम
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित क्युरिअस किड्स, प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, प्राॅस्परस पब्लिक स्कूल व ज्ञानतीर्थ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला घडवूया, मुलांचे आयुष्य’ कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी, 1 जुलै रोजी दुपारी 3 वाजता साई नाट्य मंदिर येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समितीचे संचालक महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याकरिता कशा प्रकारचे शिक्षण अभिप्रेत आहे, बालवयापासूनच मुलांच्या आवडी निवडी कशा जाणून घ्यावात आदी महत्त्वाच्या गोष्टीविषयी पाटील मार्गदर्शन करणार आहेत. सेलू शहरातील जास्तीत जास्त पालकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.
चिंतेचे ढग : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा; महिनाभरात ३८ टक्केच बरसला