विनायक काकडे यांचा सत्कार; एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश
सेलू : तालुक्यातील कवडधन येथील विनायक बापूराव काकडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या तसेच महापारेषण कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या महाट्रान्सको परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. दोन्ही विभागातील सहाय्यक अभियंता पदासाठी ते पात्र ठरले आहेत. याबद्द्ल कवडधन ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. एमपीएससी पूर्व व मुख्य परीक्षे नंतर तोंडी परीक्षेतही काकडे यांना यश आले. तसेच; नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या महाट्रान्सको परीक्षेतही ते यशस्वी ठरले. या यशाबद्दल कवडधन ग्रामस्थांतर्फे विनायक यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, सभापती अशोक काकडे, संतोष कुलकर्णी, बापूराव काकडे, अमृतराव काकडे, अंकुशराव काकडे, कचरू काकडे, ज्ञानेश्वर काकडे, राधाकिशन महाराज गोरे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.