सेलूतील अपूर्वा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सेलूतील अपूर्वा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सेलू जि.परभणी : राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेत सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या अपूर्वा तंत्रनिकेतनच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. अन्सारी रिझवान प्रथम, तर शेख जाहेद याने तंत्रनिकेतमधून दुसरा क्रमांक मिळविला आहे. विनायक बरसाले, योगेश राठोड, महेश पारधे, शिवराज उबाळे, दत्ता उबाळे, राहुल कदम,शेख आमेर,फारुकी मोहम्मद, बाळू राठोड, श्रीराम पवार, प्रतीक्षा लहाने व श्रेयश आर्दड आदी विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले.
या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य अशोक बोडखे, प्रा.गजानन जाधव, प्रा.श्याम वाघ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गुणववंतांचा सत्कार करण्यात आला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!