संचालक डॉ.दीपक म्हैसेकर यांची परभणी मेडिकल कॉलेजला भेट; सोयीसुविधांचा घेतला आढावा

संचालक डॉ.दीपक म्हैसेकर यांची परभणी मेडिकल कॉलेजला भेट; सोयीसुविधांचा घेतला आढावा

परभणी : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी ७ जुलै रोजी परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. इमारतीसह अन्य भौतिक सुविधांची पाहणी केली, तसेच विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला.
यानिमित्ताने डॉ.म्हैसेकर यांचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्यासह डॉ.मुकुंद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बन, डॉ.जयश्री यादव व अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वागत केले. या वेळी डॉ. म्हैसेकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या दृष्टीकोनातून विविध विभागांसाठी लागणार्‍या इमारती, त्यातील सुविधा तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्री आदींची पाहणी केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेतील व यावर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्‍वभूमीवरील त्रुटी तातडीने दूर व्हाव्यात, या दृष्टीकोनातूनही अधिष्ठाता डॉ.सुक्रे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. विशेषतः पदनिर्मिती, त्यासाठी कायमस्वरुपी नियुक्त्या, आर्थिक नियोजन, तरतूदीच्या दृष्टीने अन्य मार्ग या विषयीही जाणून घेतले. यावर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने तात्पुरते वसतीगृह उभारणीबाबतही स्पष्ट असे निर्देश दिले. वसतीगृहाकरीता जागा निश्‍चिती, अन्य भौतिक सुविधा याविषयीही आढावा घेतला. महाविद्यालयाच्या उभारणीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी बाबींवर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देशही दिले. दरम्यान, डॉ.म्हैसेकर यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचीही भेट घेतली. महाविद्यालयाच्या परिपूर्णतेच्या दृष्टीकोनातून केल्या जाणार्‍या उपाययोजनांबाबत या वेळी चर्चा झाली. त्यानंतर डॉ.म्हैसेकर नांदेडकडे रवाना झाले.

विशेषतः पदनिर्मिती, त्यासाठी कायमस्वरुपी नियुक्त्या, आर्थिक नियोजन, तरतूदीच्या दृष्टीने अन्य मार्ग या विषयीही जाणून घेतले. यावर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने तात्पुरते वसतीगृह उभारणीबाबतही डॉ.म्हैसेकर यांनी स्पष्ट असे निर्देश दिले. वसतीगृहाकरीता जागा निश्‍चिती, अन्य भौतिक सुविधा याविषयीही आढावा घेतला. महाविद्यालयाच्या उभारणीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी बाबींवर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देशही दिले. दरम्यान, डॉ.म्हैसेकर यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचीही भेट घेतली. या भेटीमध्ये वैदकीय महाविद्यालाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.


रभणी मेडिकल : शासकीय कोट्यातून शंभर प्रवेश; रूग्णसेवा, उपचारांचा दर्जा उंचावणार

आर.बी.घोडके यांचा कर आयुक्तांकडून सन्मान; सर्वाधिक जीएसटी भरण्यात परभणी जिल्ह्यात अव्वल स्थान

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!