आर.बी.घोडके यांचा कर आयुक्तांकडून सन्मान

आर.बी.घोडके यांचा

कर आयुक्तांकडून सन्मान

सर्वाधिक जीएसटी भरण्यात परभणी जिल्ह्यात अव्वल

परभणी : सेलू (जि.परभणी) येथील उद्योजक तथा शासकीय कंत्राटदार आर.बी.घोडके यांना नांदेड येथील विभागीय जीएसटी कार्यालयात नुकतेच सन्मानित करण्यात आले. २०२२-२३ या वर्षात परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात आर.बी.घोडके सलग दुसऱ्यावर्षीही पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. याबद्दल नागपूरचे अप्पर राज्य कर आयुक्त अनंता राख यांच्या हस्ते घोडके यांचा सन्मान करण्यात आला. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामाबद्दल उत्कृष्ट शासकीय कंत्राटदार, तसेच सामाजिक,धार्मिक व आध्यात्मिक कार्यातील बहुमोल योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी घोडके यांना गौरविण्यात आले आहे. जीएसटी विभागीय कार्यालयाकडून झालेल्या सन्मानाबद्दल परभणी, सेलूतील विविध स्तरातील नागरिकांकडून घोडके यांचे अभिनंदन होत आहे. जीएसटी कर सर्वाधिक भरणा करण्यामध्ये नांदेड विभागीतील तिघांचा समावेश आहे. त्यात परभणी जिल्ह्यातून अव्वल स्थानावर आहेत.

सेलू शहरातील जुन्या वालूर रोडवरील मदरसा ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हा मुख्य रस्ता सिमेंट क्रॉंकिटचा होत आहे. आर.बी.घोडके यांचेकडे या रसस्त्याचे कंत्राट आहे. अतिशय वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने सध्या हे काम सुरू आहे. या रस्त्यामुळे शहराच्या लौकिकात निश्चितच भर पडणार आहे. रस्ते कामांचा घोडके यांचा अनुभव दांडगा आहे. शिवाय कामाच्या उत्कृष्ट गुणवत्तेबाबत त्यांची ख्याती आहे. कोणत्याही परिस्थितीत कुणाशीही तडजोड न करणे. ‘काम भले अन् आपण’ हा त्यांच्या व्यवहार कुशलतेचा चांगला गुण मानला जातो.  शासकीय कंत्राटदारीमध्ये गुणवत्तापूर्ण कामांमधून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याची घोडके यांची ख्याती बहुश्रुत आहे. याच पार्श्वभूमीवर सेलूतील पहिल्याच कामांची गुणवत्ता राखण्यासाठी घोडके यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, असे दिसून येत आहे.

______________________________________________


परभणी मेडिकल : शासकीय कोट्यातून शंभर प्रवेश; रूग्णसेवा, उपचारांचा दर्जा उंचावणार

संचालक डॉ.दीपक म्हैसेकर यांची परभणी मेडिकल कॉलेजला भेट; सोयीसुविधांचा घेतला आढावा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!