मुंबईत शिवसेनेचा रविवारी राज्यस्तरीय अल्पसंख्याक मुस्लिम मेळावा; शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन
अनवर शेख
पाथरी : राज्यातील सर्वच सरकारने मुस्लिम समाजाच्या विकासाच्या केवळ घोषणा केल्या प्रत्यक्षात आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शिवसेना भाजप सरकाjच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुस्लिम समाजाचे प्रश्न समस्या आणि विविध मागण्या मार्गी लागतील. अशी भावना मुस्लिम समाजात निर्माण झाल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील शिवसनेचे सईद खान यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम मेळावारविवारीी, 9 जुले रोजी मुंबईत होत आहे
सायन मुंबई येथील षनमुखांद सभागृहात सायंकाळी 5 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याचे मार्गदर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार आहेत. अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत उपस्थिती राहणार आहेत. यावेळी खासदीर श्रीकांत शिंदे ,शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, माजी मंत्री रामदास कदम, माजी खासदार अनंतराव अडसूळ , खासदार भावना गवळी , खासदार राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव ,आमदार सदा सरवनकर, शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ,खनिक कर्म मंत्री दादा भुसे ,राज्य उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई , आमदार भरत गोगावले ,आमदार मंगेश कुडाळकर , आमदार प्रकाश सुर्वे, आमदार किरण पावसकर, आमदार दिलीप लांडे , शिवसेना सचिव संजय मोरे, संजय मासोलकर , ठाणे येथील माजी महापौर नरेश मस्के ,मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्राचे शिवसेना युवा नेते सईद खान यांनी केले आहे
राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत , अनेक सरकारने केवळ कोरड्या घोषणा केल्या आहेत , मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही , ही बाब लक्षात घेऊन शिवसेना नेते सईद खान यांनी मुस्लिम मेळावा आयोजित केला आहे राज्यभरातुन मुस्लिम समाजातील विविध पक्षाचे राजकीय क्षेत्रात काम करणारे जवळपास 300 पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार आहेत यात नगराध्यक्ष, नगरसेवक , माजी नगरसेवक उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनिअर ,व्यवसायिक, यांचा समावेश आहे मेळाव्याला राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत..