हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा स्फूर्तिदायी : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी; सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थी दैनंदिनीचे विमोचन
परभणी : हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणातून ऐतिहासिक ठरलेला हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा, पिढ्यानपिढ्यांसाठी स्फूर्तिदायी ठरणारा आहे, असे प्रतिपादन मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी शनिवारी (८जुलै) सेलू येथे केले.
सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील ‘माहितीपुस्तिका आणि विद्यार्थी दैनंदिनी’चे विमोचन माजी विद्यार्थी व सुलेखनकार रविंद्र मुळावेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी प्राचार्य कुलकर्णी बोलत होते. मुख्याध्यापक नारायण सोळंके, संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर यांची उपस्थिती होती. प्राचार्य कुलकर्णी यांनी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील योगदान याबाबत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. मुक्तीसंग्रामातील विविध प्रसंग सांगताना विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते. शाळेच्या दैनंदिनीला हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा संदर्भ आहे, असे अशोक लिंबेकर यांनी नमूद केले व उपयुक्ततेबद्दल माहिती दिली. यानिमित्ताने समितीचे संयोजक बन्सीलाल पद्मावत, बाबासाहेब हेलसकर,अशोक लिंबेकर तसेच; सुनील तोडकर यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. संतोष पाटील यांनी आभार मानले.
आर.बी.घोडके यांचा कर आयुक्तांकडून सन्मान
परभणी मेडिकल : शासकीय कोट्यातून शंभर प्रवेश; रूग्णसेवा, उपचारांचा दर्जा उंचावणार
संचालक डॉ.दीपक म्हैसेकर यांची परभणी मेडिकल कॉलेजला भेट; सोयीसुविधांचा घेतला आढावा