पोहताना पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू; सेलूजवळील निम्न दुधना धरण परिसरातील घटना 

पोहताना पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू; सेलूजवळील निम्न दुधना धरण परिसरातील घटना 

परभणी : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना धरणाच्या गेटजवळील नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सेलूतील दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (९ जुलै रोजी) दुपारी चारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रोहित दीपक टाक, वय २३ आणि नितीन गुणाजी साळवे वय २५ ( दोघेही रा.गायत्री नगर, सेलू) अशी मृत तरुणांची नावे आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांच्यासह परतूर, सेलू पोलीसांनी तातडीने धाव घेतली. धरणांमध्ये मच्छीमारीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणांनी मोठ्या शर्थीने मृतदेह बाहेर काढले आहेत. ओळख पटल्यानंतर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

 

____

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!