CSC : शासकीय सोयीसुविधा, कर्मचार्याचा दर्जा द्या; सेलूतील सीएससी केंद्रचालकांची मागणी
प्रशासनाला निवेदन, तात्काळ मागण्या मंजूर करण्याची मागणी
परभणी : शासनाने सीएससी केंद्र चालकासाठी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे ठराविक मासिक पगार तसेच; कार्यालयासाठी लागणारी सर्व साहित्य सामग्री लॅपटॉप, कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक स्कॅनर, नेट बिल, लाईट बिल, कार्यालयाचा मासिक किराया या सर्व शासकीय सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी सेलूतील सीएससी केंद्रचालकांनी सोमवारी (१० जुलै) रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांना सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालया मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सीएससी केंद्र चालक आपल्या शासनाच्या योजना पूर्णपणे राबवण्यासाठी तत्पर तयार असतो. परंतु या योजना राबवताना फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा आणि जनतेचा विचार केला जातो. यामध्ये सीएससी केंद्र चालकाचा कोणतीही विचार केला जात नाही, तसेच समस्या ऐकून न घेता परत त्यालाच योजना राबवण्यासाठी जाचक अटी निर्माण करून मानसिक व आर्थिक स्वरूपात पूर्णपणे नुकसान पोहोचली जाते. त्यामुळे शासनाने सीएससी केंद्र चालकासाठी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे ठराविक मासिक पगार तसेच कार्यालयासाठी लागणारी सर्व साहित्य सामग्री लॅपटॉप, कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक स्कॅनर, नेट बिल, लाईट बिल, कार्यालयाचा मासिक किराया या सर्व सोयी शासकीय उपलब्ध करून तसेच सीएससी केंद्र चालकासाठी काम करण्याचा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे ठराविक वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत व आठवड्यातील सुट्टी तसेच; काम करते वेळेस नजर चुकीने झालेल्या चुका दुरुस्त करण्याची सुविधा करावी. या सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात आणि सीएससी केंद्र चालकाचे मनोबल उंचावण्याचे काम करावे, असे केल्यास शासनाच्या सर्व योजना सर्वासाठी हितदायक ठरवून सीएससी केंद्र चालकाचे मनोबल उंचावेल आणि सीएससी केंद्र चालक समाजामध्ये मानसन्मानाने वावरू शकेल. त्यामुळे या सर्व योजना सीएससी केंद्राचालकासाठी उपलब्ध कराव्यात. या अगोदर कर्जमाफी योजना, ई श्रमकार्ड, आयुष्यमान भारत , दिव्यांग नोंदणी या कार्यक्रमाचे कोणतेही मानधन अद्यापही प्राप्त झालेले नाही. चालकांना परवडेल असा योग्य दर ( मोबदला ) दयावा. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सेलू तालुक्यातील सीएससी चालकांच्या सह्या आहेत. महादेव गायके, सचिन कोरडे, कृष्णा बिजुले, महेंद्र पाठक, संतोष मिरगे, अमोल बाबर, गणेश शेवाळे, किशोर गायकवाड, बी.डी. चिंचणे, शरद शिंदे, परमेश्वर आंधळे, किशोर भांडवले आदींसह सीएससी चालक उपस्थितीत होते.
सीएससी केंद्र चालकासाठी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे ठराविक मासिक पगार तसेच कार्यालयासाठी लागणारी सर्व साहित्य सामग्री लॅपटॉप, कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक स्कॅनर, नेट बिल, लाईट बिल, कार्यालयाचा मासिक किराया या सर्व सोयी शासकीय उपलब्ध करून द्याव्यात. या माध्यमातून सीएससी केंद्र चालकाचे मनोबल उंचावण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.