शॉर्टसर्किटमुळे आग लागून घराचे मोठे नुकसान; सेलूतील खतीब मोहल्ला भागातील घटना

शॉर्टसर्किटमुळे आग लागून घराचे मोठे नुकसान; सेलूतील खतीब मोहल्ला भागातील घटना

सेलू : येथील खतीब मोहल्ला भागातील शेख मोहसीन शेख शेरफुद्दीन यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घराचे मोठे नुकसान झाले. सोमवारी (१० जुलै ) पहाटे ही घटना घडली.
या बाबत माहिती अशी की, खतीब मोहल्ला येथील शेख मोहसीन शेख शेरफुद्दीन मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सोमवारी ते वृद्ध आई आजारी असल्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी शिवाजीनगर येथे मुक्कामी थांबले होते. रात्री दीड वाजता आजूबाजूचे लोक झोपलेले असताना मोहसिन यांच्या घराला अचानक आग लागल्याची शेजाऱ्यांना चाहूल लागताच इसा कुरेशी, सद्दाम कुरेशी, जावेद पठाण सय्यद मुस्ताक यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, इम्तियाज खान, जावेद पठाण, ईसा कुरेशी, सद्दाम कुरेशी, शेखअजहर, रज्जाक कुरेशी, सय्यद मुशताक साजीद कुरेशी यांनी भेट देऊन संबंधितांची विचारपूस केली. तातडीची मदत म्हणून रोख आर्थिक मदत करीत धीर दिला.


समर्पित नेतृत्वच समाजाला योग्य दिशा देते : साध्वी अनुराधा दीदी; कासार समाजाचे माजलगाव अधिवेशन उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!