श्रीपुरुषोत्तम मास : सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात महिनाभर विविध कार्यक्रम
सेलू : सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान वतीने श्रीपुरुषोत्तम मास (अधिक मास) निमित्त महिनाभर श्री विष्णुसहस्त्रनाम पाठ, रुद्र अभिषेक या दैनंदिन कार्यक्रमांसह १८ जुलैपासून दररोज सायंकाळी साडे पाच ते सात या वेळेत हभप संजय महाराज पिंपळगाकर यांचे श्रीमद् भागवत ग्रंथातील विविध विषयांवर चिंतनात्मक प्रवचने आजी विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिराचे पुजारी सुधीर मंडलिक यांनी ही माहिती दिली. यानिमित्ताने भगवान श्री विष्णूंची विशेष आराधना केली जाते. दररोज सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन व श्री विष्णुसहस्त्रनाम पाठासाठी ग्रंथ संस्थानच्या वतीने उपलब्ध असतील. पाठ झाल्यावर ग्रंथ परत जागेवर ठेऊन जावे. आपले नांव रजिस्टर मध्ये नोंद करावी.
या काळात रोज सकाळी रुद्र अभिषेक होतील. यासाठी पुजाऱ्यांशी संपर्क साधावा. बाहेर गावी राहणारे भक्त सुद्धा रुद्र अभिषेकासाठी सुधीर मंडलिक (९९६०१६०३२३) यांच्याकडे संपर्क साधावा.
पुरुषोत्तम मास निमित्त दररोज सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत श्रीमद् भागवत ग्रंथातील विविध विषयांवर प्रवचनकार संजय पिंपळगावकर यांचे १८ जुलै ते ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रवचने होणार आहेत. भाविकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.