१७ जुलैपासून ‘जागर श्यामच्या कथांचा’; हेलस सानेगुरुजी कथामालेचा राज्यस्तरीय उपक्रम
४२ दिवस ४२ कथा; सहभागाचे आवाहन
डॉ.सुहास सदाव्रते…
परभणी/ जालना : तीन दशकांपासून वंदनीय साने गुरुजींच्या ‘ खरा तो एकचि धर्म ‘ या विचारांचा जागर मांडत हेलस येथील साने गुरुजी कथामाला वाटचाल करीत आहे. शालेय विद्यार्थ्यात सुसंस्काराचे बीजारोपण व्हावे, यासाठी बेचाळीस दिवस ‘ श्यामच्या कथांचा जागर ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रतील विविध शाळांमधून हजारो विद्यार्थ्याचा सहभाग राहणार आहे,हे विशेष. येत्या १७ जुलैपासून शाळांमधून संस्कार कथांचा जागर मांडला जाणार आहे.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलसतर्फे शिक्षणाबरोबरच सुसंस्कार व मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने पूज्य साने गुरुजींच्या ‘ श्यामचीआई ‘ पुस्तकातील ४२ कथां समावेश असलेल्या ‘ जागर श्यामच्या कथांचा’ हा उपक्रम १७ जुलैपासून पुन्हा राबविण्यात येणार आहे. या कथांची उत्कृष्ट अभिवाचन निर्मिती राजेंद्र जोशी ( छत्रपती संभाजीनगर) यांची आहे. उपविभागीय अधिकारी अंजली धानोरकर यांनी आपल्या सुमधूर रसाळवाणीतून अभिवाचन केले आहे.
या कथा प्रत्येक मुलांपर्यत शैक्षणिक ग्रुपच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी शिक्षक, पालक, कथामालेचे कार्यकर्ते यांचे महाराष्ट्र पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षात विविध शाळांतील तीन हजारांवर विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी ऑनलाईन प्रमाणपत्रही देण्यात आले. यंदाही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाच्या नियोजनासाठी महाराष्ट्र उपक्रम समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, डाॅ.सुहास सदाव्रते, आर.आर.जोशी, जमीर शेख, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, संतोष मुसळे,सतीश कुलकर्णी,संतोष लिंगायत, प्रमोद देशमुख,मंताजी ढाकरे,डाॅ.दिगंबर दाते,संदीप इंगोले यांचा सहभाग आहे. विविध शाळांतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक सहभागासाठी पालक व शिक्षकांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन संयोजक तथा हेलस साने गुरुजी कथामाला शाखाध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर व संयोजन समितीने केले आहे.
उपक्रम असा आहे…
• महाराष्ट्रातील विविध शाळेत परिपाठात ऑडीओ माध्यमातून दररोज कथांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
• दररोज एक कथा या प्रमाणे ४२ दिवस ४२ कथा शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पाठविण्यात येतील.
• परिपाठामध्ये मुलांना कथा ऐकविण्यासाठी उपक्रमाचे दररोज आयोजन व्यवस्था शाळांमधून करण्यात येईल.
• उपक्रमात ४२ कथा ऐकून झाल्यावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
• सर्व विद्यार्थ्यांना व सहभागी शाळांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल.अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया शिक्षकांनी व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हावे. ग्रुपमध्ये असल्यास लिंक पुढे फॉरवर्ड करून सहकार्य करण्याचे आवाहन साने गुरुजी कथामाला संयोजन समितीने केले आहे. सहभागासाठी… Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/CFRkLFQIysH0TuoSyUEBNq