सेलूतील साईबाबा बँकेला वसंतदादा पाटील पुरस्कार; छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड
परभणी : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड मुंबईतर्फे दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२०२२ साठी ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार’ या गुणवत्ता पुरस्कारासाठी सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेची निवड झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातून १०० ते २५० कोटीपर्यंत ठेवी असणाऱ्या बँक गटात ही निवड करण्यात आली असल्याचे एमएससीबीएचे चेअरमन विश्वास ठाकूर यांनी बँकेला कळविले आहे. २३ सप्टेंबरला नाशिक येथे आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.सेलूतील साईबाबा बँकेची ‘आपली बँक’ म्हणून ओळख आहे. सेलू, वालूर, परभणी, मानवत, जिंतूर, बोरी या सहा शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बॅंकेचे सन्मानीय पदाधिकारी, संचालक, अधिकारी,अनुभवी कर्मचारी यांच्या बळावर ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा या पुरस्कारामुळे गौरव झाला आहे, असे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी सांगितले. पुरस्काराबद्दल अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांचा गुरूवारी,१३ जुलै रोजी सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, संचालक इम्रान अहेमद, दत्तराव आंधळे सय्यद मुश्ताक रब्बानी, निसार पठाण आदींची उपस्थिती होती.
बॅंकेचे सन्मानीय पदाधिकारी, संचालक, अधिकारी,अनुभवी कर्मचारी यांच्या बळावर ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा या पुरस्कारामुळे गौरव झाला आहे, असे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी सांगितले.