शिष्यवृत्ती परीक्षा : सेलूतील नूतन विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; गुणवंतांचे विविध स्तरांतून कौतुक
सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी, १३ जुलै रोजी जाहीर झाला. यामध्ये सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयातील अकरा विद्यार्थी जिल्हायादीत शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. यामध्ये इयत्ता पाचवीतील शिवाक्ष सोमशंकर कांदळे या एकमेव विद्यार्थ्याचा समावेश आहे. 198 गुण मिळवून जिल्ह्यातून तो १०५ वा आहे.
इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची नावे ( कंसात ३०० पैकी गुण, जिल्हा यादीतील क्रमांक) : श्लोक लक्ष्मीकांत कुलकर्णी (248, सहावा), पियुष प्रदीप मुनेश्वर (244 गुण, 8 वा), महेश तुकाराम भाबट, 220, 23 वा, यज्ञेश्वर राजेभाऊ टोम्पे (212, 32 वा ), विवेक अंशीराम गव्हाणे (200,56 वा), रितेश रमेश लहाने (200, 57 वा), विकास मारोती घुगे (198, 59 वा), वरद मुकुंदराव बरकुले (194, 66 वा), सिद्धांत शेषराव नागरे (192, 68 वा), तन्मय प्रशांत कुलकर्णी (190, 79 वा)
शिष्यवृत्तीधारकांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरुजी, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष सितारामजी मंत्री, प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक किरण देशपांडे व देवीदास सोनेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शिष्यवृत्तीधारकांचे अभिनंदन केले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल रविवारी, 30 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला. राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 22 टक्के, परभणी जिल्ह्याचा 14 टक्के, तर नूतन विद्यालयाचा संकलित निकाल 23 टक्के आहे. त्यामध्ये शाळेचे 40 विद्यार्थी पात्र झाले आहेत. 13 जुलै रोजी अंतिम निकालानंतर पात्र विद्यार्थ्यांतून 11 विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीधारक म्हणून जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झाला आहे. शिष्यवृत्ती विभाग प्रमुख एस.आर.तोडकर, बी.एन.पद्मावत, ए.एल.अंबेकर, व्ही.आर.कडगे आदींसह भाषा, गणित व विज्ञान, समाजशास्त्र विषय शिक्षकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
सेलूतील साईबाबा बँकेला वसंतदादा पाटील पुरस्कार; छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड