CHANDRAYAAN-3 : सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

CHANDRAYAAN-3 : सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग, मान्यवरांचे मार्गदर्शन

सेलू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) शुक्रवारी,१४ जुलै रोजी चंद्रयान- ३ या चंद्रशोध मोहीम यानाचे प्रक्षेपण केले. त्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने श्रीराम प्रतिष्ठान सेलूतर्फे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी चांद्रयानाचे पेपर मॉडेल बनविले. चित्रफितीच्या माध्यमातून चांद्रयान- ३ मोहीम समजावून सांगितली. चांद्रयान-३ चे विविध पार्टस्, त्यांची कार्ये याबाबत नारायण चौरे, विठ्ठल सरकटे,दुर्गा ,राहुल यांनी माहिती दिली. चांद्रयानाचे पेपर मॉडेल तयार करून घेण्यात आले. ए.पी.जे.अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.अविनाश औंधकर, अशोक क्षीरसागर, पेपर किट मॉडेल विषयी मार्गदर्शन व पेपर किट नियोजित उपलब्ध करून दिले.

आंतरराष्ट्रीय चंद्रमहोत्सव दिन आणि चंद्रयान 3 मोहीम विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला कृतीशील जोड मिळावी, अभ्यासपूर्ण व ज्ञानयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृृतीसाठी श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या मार्गदर्शना खाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमेचा उद्देश, चंद्राच्या ज्या भूभागावर उतरणार त्याचे महत्त्व, तांत्रिक बदल, पे लोड अंतर्गत समाविष्ट उपकरणांची माहिती, शास्त्रीय प्रयोग असे वैज्ञानिक व तांत्रिक मुद्यांवर डॉ संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-३, देशाची ही तिसरी चांद्रमोहीम आहे यशस्वी होवो यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, मुख्याध्यापक शालिनी शेळके यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!