CHANDRAYAAN-3 : चांद्रयान मोहीमेची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती; सेलूतील साई अकॅडमीचा उपक्रम
सेलू : चांद्रयान-३ शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी ठीक दोन वाजून 35 मिनिटाला प्रक्षेपित झाले. या संदर्भात साई अकॅडमीच्या वतीने आयोजित उपक्रमामध्ये श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या प्रसंगी विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचा, तसेच कृष्णा पांचाळ, सर्जेराव सोळंके यांचा सत्कार करण्यात आला. चांद्रयान तीन मोहिमेमध्ये वापरण्यात आलेले रोवर आणि रोबोट कशा पद्धतीने तयार केले गेले याचीही माहिती देण्यात आली. ॲकडमीतर्फे विद्यार्थ्यांना छोटे छोटे रोबोट तयार करण्याचे शिकविले जाते. सेलू शहरामध्ये साई अकॅडमीने रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन संचालक संतोष नारवाणी यांनी केले.