सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन; मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी
माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा पुढाकार; मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन
सेलू : श्री संत साईबाबांचे सद्गुरू व सेलूचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर विकासासाठी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एक कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गत शुक्रवारी, १४ जुलै रोजी सभामंडप कामाचे भूमिपूजन झाले.
माजी आमदार हरिभाऊ लहाने व संदीप लहाने यांच्या हस्ते सपत्नीक भूमिपूजन करण्यात आले. या वेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, सातवे वंशज लक्ष्मीकांत सुभेदार, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, ओमप्रकाश तोष्णीवाल, राजेंद्र मणियार, अविनाश शेरे, संजय पिंपळगावकर आदींची उपस्थिती होती. या वेळी बोलताना माजी आमदार लहाने यांनी सांगितले की, असून उर्वरित कामासाठी दोन कोटींचा निधी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न असून लवकरच तो निधी देखील मिळेल. वेदमूर्ती उमेश गुरू विडोळीकर व सुधीर मंडलिक यांनी पौरोहित्य केले. महाप्रसादाने सांगता झाली. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, संतोष कुलकर्णी, बंडू देवधर, योगेश कुलकर्णी, पारस काला, मनोज दीक्षित, अविनाश कुलकर्णी, सौरभ देशपांडे, पांडुरंग कावळे, हरिभाऊ काळे, रंगनाथराव वाकणकर, चक्रधर उगले, अशोक गिराम, पुजारी केशवराव मंडलिक, वामन मंडलिक, पुरुषोत्तम मंडलिक आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.