शिष्यवृत्ती परीक्षेत कुंदन पाटीलचे यश; सेलू तालुक्यातून पटकावला आठवा क्रमांक

शिष्यवृत्ती परीक्षेत कुंदन पाटीलचे यश; सेलू तालुक्यातून पटकावला आठवा क्रमांक

सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेलू (जि.परभणी) श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या कुंदन नरेश पाटील या विद्यार्थ्यांने ३०० पैकी २१६ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. सेलू तालुक्यातून आठवा क्रमांक पटकावला आहे, तर परभणी जिल्ह्यातून ६१ वा आहे . विशेष म्हणजे कुंदन पाटील याने मराठी माध्यमातून सेलू तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी, सचिव महेश खारकर, सहसचिव अभय सुभेदार, संचालक जयंतराव दिग्रसकर, ॲड.किशोर जवळेकर, विष्णूपंत शेरे, डॉ.प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर, ललित बिनायके, रामेश्वर राठी, अशोक चामणीकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पी.एस.कौसडीकर यासह शिक्षक व कर्मचार्‍यांनी कुंदनचे कौतुक केले आहे

.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!