नूतन कन्या प्रशालेच्या पाच विद्यार्थ्यिनी शिष्यवृत्ती धारक

नूतन कन्या प्रशालेच्या पाच विद्यार्थ्यिनी शिष्यवृत्ती धारक

सेलू (जि.परभणी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल १३ जुलै रोजी जाहीर झाला. सेलूतील लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या पाच विद्यार्थीनी जिल्हायादीत शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. शिष्यवृत्तीधारकांचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारकामध्ये प्रतिक्षा शरद चिंचोलकर 220 गुण मिळवून जिल्ह्यात 54 व्या क्रमांकावर आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी : स्नेहा प्रदिप मुनेश्वर (238, जिल्ह्यात 12 वी), श्रेया गजानन राऊत (230,16 वी), ज्ञानेश्वरी आसाराम रासवे (230, 19 वी), अक्षरा पंजाब गलबे (208, 38 वी) शिष्यवृत्तीधारकांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष, डी.के. देशपांडे, सचिव डॉ.व्ही के कोठेकर , सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी मुख्याध्यापिक संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे सर, पर्यवेक्षक रोहिदास मोगल आदींसह पालक, शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!