नियोजनाला प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गरज : आदित्य खरात; सेलूच्या नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार
अभिमानास्पद : अकरा विद्यार्थ्यांना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान; आयआयटीपात्र आदित्य खरात यांचा विशेष सन्मान
सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांनी परभणी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा शनिवारी, १५ जुलै रोजी सत्कार करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना शाळेचे माजी विद्यार्थी तथा आयआयटीपात्र आदित्य नारायण खरात म्हणाले, ” ध्येय्यपूर्तीसाठी नियोजनाची सातत्यपूर्ण अमंलबजावणी व प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची आहे.”
इयत्ता पाचवीतील शिवाक्ष कांदळे, इयत्ता आठवीतील श्लोक कुलकर्णी, पियुष मुनेश्वर, महेश भाबट, यज्ञेश्वर टोम्पे, विवेक गव्हाणे, रितेश लहाने, विकास घुगे, वरद बरकुले, सिद्धांत नागरे, तन्मय कुलकर्णी, तसेच स्वरा लाठकर या जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. देशपातळीवर २७६ वे स्थान पटकावून आयआयटी प्रवेशपात्र ठरलेला माजी विद्यार्थी आदित्य खरात यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक नारायण सोळंके, किरण देशपांडे, देवीदास सोन्नेकर, विभाग प्रमुख सुनील तोडकर, बन्सीलाल पद्मावत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आदित्य खरात म्हणाले, “स्वतःची आवड ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे. केवळ गुणांच्या अथवा रॅंकच्या मागे धावाधाव करण्यापेक्षा, संबंधित विषयांतील परिपूर्ण ज्ञान संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण नियोजनाची अंमलबजावणी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत. त्याचा कौशल्यपूर्ण उपयोग आणि वेळोवेळी शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेणेही आवश्यक आहे.”
किरण देशपांडे यांनी, अकरा शिष्यवृत्तीधारकांनी शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे, असे नमूद करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मार्गदर्शक शिक्षक अरविंद अंबेकर, वीरेश कडगे, आरती कदम, वर्षा कदम, गजानन मुळी, जेष्ठ शिक्षक परशराम कपाटे, बाबासाहेब हेलसकर, संतोष मलसटवाड, काशीनाथ पल्लेवाड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुनील तोडकर यांनी केले.
आदित्य खरात म्हणाले, “स्वतःची आवड ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे. केवळ गुणांच्या अथवा रॅंकच्या मागे धावाधाव करण्यापेक्षा, संबंधित विषयांतील परिपूर्ण ज्ञान संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण नियोजनाची अंमलबजावणी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत. त्याचा कौशल्यपूर्ण उपयोग आणि वेळोवेळी शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेणेही आवश्यक आहे.”
नूतन कन्या प्रशालेच्या पाच विद्यार्थ्यिनी शिष्यवृत्ती धारक; शाळेने केले कौतुक
परभणीच्या ‘वनामकृवि’ला आंतरराष्ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्कार;न्यूयॉर्क येथे १५ सप्टेंबरला वितरण
सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन; मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी
सेलूतील साईबाबा बँकेला वसंतदादा पाटील पुरस्कार; छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड