कौतुकास्पद : चार विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक; डासाळा जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश

कौतुकास्पद : चार विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक; डासाळा जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश

शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यिंनींचे विविध स्तरांतून कौतुक 

सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सेलू (जि.परभणी) तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या चार विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. या विद्यार्थिनींचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. 

१३ जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. पात्र विद्यार्थ्यांमधून राज्य , जिल्हा, तालुकानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत समाविष्ट विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते. डासाळा शाळेतील इयत्ता पाचवीच्या अनुष्का अशोक राठी, हर्षदा पांडुरंग कदम आणि मोहिनी मोहन गजमल, तर इयत्ता आठवीतील स्नेहल गोविंदराव गजमल या विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश संपादन करीत शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. सदाशिव मुळी, पुष्पा नवले, ज्योती भागवत, दिपा रायबोले, कीर्ती अंबेकर, विजया देशपांडे या शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांसह विविध स्तरांतून शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थिनींचे अभिनंदन केले जात आहे.

डासाळा शाळेतील इयत्ता पाचवीच्या अनुष्का अशोक राठी, हर्षदा पांडुरंग कदम आणि मोहिनी मोहन गजमल, तर इयत्ता आठवीतील स्नेहल गोविंदराव गजमल या विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश संपादन करीत शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!