शिष्यवृत्ती परीक्षा : शिराळ्याच्या स्नेहल खेडेकरचे घवघवीत यश; ग्रामस्थांनी केले भरभरून कौतुक
सेलू : सेलू तालुक्यातील शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहल योगेश खेडेकर या विद्यार्थिनींने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. शिराळा ग्रामस्थांच्या वतीने स्नेहलचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नबाजी खेडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण बुरेवार, अशोक खेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक मार्गदर्शक बाळासाहेब झोरे यांनी केले. सूत्रसंचालन शारदा शिंदे, तर आभार वसंत खेडेकर यांनी मानले यशस्वीतेसाठी गीताराम खेडेकर, संतोष शिंदे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.