No Coaching Class :  गार्गी पोहोचली कानपूर आयआयटीला; सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये सत्कार 

No Coaching Class :  गार्गी पोहोचली कानपूर आयआयटीला; सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये सत्कार 

गार्गी ढालकरीचे आयआयटीचे ध्येय पूर्ण; युट्यूबवरील व्हिडिओ, नोट्सद्वारे सातत्यपूर्ण केला स्व-अभ्यास

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलची माजी विद्यार्थिनी गार्गी प्रमोद ढालकरी या विद्यार्थिनीची आयआयटी कानपूरसाठी प्रवेशपात्र ठरली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते शाळेच्या वतीने गार्गी व पालकांचा सत्कार करण्यात आला.

मुलांना नेहमी शास्त्रज्ञ, उद्योगपती, कुशाग्र बुद्धीमत्तेच्या प्रसिद्ध व्यक्तीच्या निवडक गोष्टी सांगाव्यात व त्याप्रमाणे या मोठ्या पदावर पोहोचण्यास त्या व्यक्तींना काय श्रम करावे लागले, किती अभ्यास करावा लागला, याची माहिती मुलांच्या मनावर परिणामकारकरीत्या रुजेल, असे पहावे. कठोर परिश्रमास पर्याय नाही. याबद्दल त्यांच्या मनात संदेह राहू नये. आपल्या शाळेच्या चार विद्यार्थ्यांची टॉप आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे, असे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

आयआयटी प्रवेशासाठी जेईई परीक्षा भारतात सर्वात कठीण समजली जाते. परंतु , या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मी कुठलाही कोचिंग क्लास केला नव्हता. आवश्यकतेनुसार युट्यूबवरील ऑनलाईन विडिओ, नोट्स याचा नियमित व नियोजनबद्ध पद्धतीने सातत्यपूर्ण अभ्यास केला. कुठल्याही यशासाठी पाया मजबूत असला पाहिजे. प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये पाया पक्का झाला.शिक्षक, शाळेतील प्रेसिडेंशिअल टेस्ट, डि्कनार ग्रुप ऍक्टिव्हिटी, क्रॅश कोर्स या विविध उपक्रमांचा मला फायदा झाला. डॉ.संजय रोडगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, असे मत गार्गी ढालकरीने व्यक्त केले.या वेळी प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, गार्गीचे वडील प्राध्यापक प्रमोद ढालकरी, तसेच शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अझीझ यांनी केले. आभार नारायण चौरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सत्काराला उत्तर देताना गार्गी ढालकरी म्हणाली, ” आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी मी कुठलाही कोचिंग क्लास केला नव्हता. आवश्यकतेनुसार युट्यूबवरील ऑनलाईन विडिओ, नोट्स याचा नियमित व नियोजनबद्ध पद्धतीने सातत्यपूर्ण अभ्यास केला. कुठल्याही यशासाठी पाया मजबूत असला पाहिजे. प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये पाया पक्का झाला शिक्षक, शाळेतील प्रेसिडेंशिअल टेस्ट, डि्कनार ग्रुप ऍक्टिव्हिटी, क्रॅश कोर्स या विविध उपक्रमांचा मला फायदा झाला.”


शिष्यवृत्ती परीक्षा : शिराळ्याच्या स्नेहल खेडेकरचे घवघवीत यश; ग्रामस्थांनी केले भरभरून कौतुक

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!