Pharmacy : सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये बी.फार्मसी, डी.फार्मसी अभ्यासक्रमाला मान्यता
डॉ.संजय रोडगे यांची माहिती : प्रवेश प्रकिया सुरू
सेलू जि.परभणी : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या द्वारे श्रीराम प्रतिष्ठान संचालित आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी.फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळालेली आहे. बी.फार्मसीसह डी.फार्मसी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी सोमवारी (१७ जुलै) दिली.
सेलू व परिसरातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरामध्ये जे औषधनिर्माणशास्र शिक्षण दिले जाते. त्याच धरतीवर आता विद्यार्थ्यांना सेलू शहरामध्ये औषधनिर्माणशास्र पदवी व पदविकेचे (B.Pharma & D.Pharma) शिक्षण घेता येणार आहे, असे डॉ.रोडगे म्हणाले. महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी एकवेळ महाविद्यालयातील उपलब्ध भौतिक तथा शैक्षणिक सुविधा बघून आपला प्रवेश निश्चित करावा; तसेच सेलूमधील पहिले व एकमेव असलेल्या या औषधनिर्माणशास्र पदवी अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.संजय रोडगे यांनी केले आहे. दरम्यान, सेलू शहरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांची गरज लक्षात घेऊन नवनवीन अभ्यासक्रम प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सीबीएसई अभ्यासक्रम, नर्सिंग, पॉलिटेक्निक, डी.एड, बी.एड अभ्यासक्रम व आता यामध्ये आणखी बी फार्मसी व डी फार्मसी या अभ्यासक्रमाची भर पडली आहे. यानिमित्ताने डॉ.संजय रोडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, डॉ.नीलिमा सिंह, प्रा.अशोक बोडखे, प्रा.बाजीराव मोगल, प्रा.नारायण चौरे व श्रीराम प्रतिष्ठान संचालित सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना सेलू शहरामध्ये औषधनिर्माणशास्र पदवी व पदविकेचे (B.Pharma & D.Pharma) शिक्षण घेता येणार आहे, असे डॉ.रोडगे म्हणाले. महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी एकवेळ महाविद्यालयातील उपलब्ध भौतिक तथा शैक्षणिक सुविधा बघून आपला प्रवेश निश्चित करावा; तसेच सेलूमधील पहिले व एकमेव असलेल्या या औषधनिर्माणशास्र पदवी अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.संजय रोडगे यांनी केले
सेलूतील आदित्य बी.फार्मसी कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन; आमदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती
सेलूत जूनपासून बी.फार्मसी शिक्षणाची सोय; श्रीराम प्रतिष्ठानला अभ्यासक्रमाची मान्यता