Helping Hands : ‘हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप; सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात कार्यक्रम

Helping Hands : ‘हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप; सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात कार्यक्रम

सेलू : ‘हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप मंगळवारी , १८ जुलै रोजी करण्यात आले.
श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे सचिव महेश खारकर, गटकळ ॲकडमीचे रामेश्वर गटकळ, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, डाॅ.अनिकेत जोगदंड, संयोजक सुनील गायकवाड, संजय चव्हाण, ज्ञानेश्वर कावळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष सतीश जाधव, पी.के.शिंदे, मुख्याध्यापक पी.एस.कौसडीकर, अल्का धर्माधिकारी, शुकाचार्य शिंदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला तसेच; साने गुरुजी कथामलेचे कै.दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांनी केले. कै.दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतून ‘हात मदतीचा’ उपक्रम मागील पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे. या अंतर्गत शहरातील २३३४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले आहे, असे गायकवाड यांनी या वेळी नमूद केले. या वेळी महेश खारकर, प्रा.नागेश कान्हेकर, प्रदिप कौसडीकर, नारायण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. केशवराज बाबासाहेब विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक कुंदन नरेश पाटील याचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले. कार्यक्रमासाठी नानासाहेब गायकवाड, बबलू बदाले, विठ्ठल काळे, शिक्षक, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!