Parbhani Rainfall : सर्वदूर पावसाने पिकांना जीवदान; मोठ्या पावसाची प्रतीक्षाच 

Parbhani Rainfall : सर्वदूर पावसाने पिकांना जीवदान; मोठ्या पावसाची प्रतीक्षाच 

परभणी : गेल्या दीड महिन्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मंगळवारी, १८ जुलै रोजी सायंकाळनंतर पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. जिंतूर तालुक्यातील सावंगी व बामणी मंडळात १०७ मिलीमीटर पाऊस झाल्याने शेतशिवारात पाणी साचले. लहान ओढे, नाले भरून वाहू लागले. दरम्यान मंगळवारी दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. रात्रभर जिल्ह्सयात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणी तालुक्यातील पेडगाव, झरी, टाकळी कुंभकर्ण, जिंतूर तालुक्यात दीड महिन्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील दुधगाव, आडगाव सावंगी, बामणी, तर सेलूतील वालूर, मोरेगाव, चिकलठाणा मंडळात मुसळधार पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर पावसाची रिमझिम सुरू झाली. दरम्यान, जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना सिंचन प्रकल्पाची पाणी पातळी किंचित वाढून, जिवंत पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे. त्यासाठी अजुनही दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. 

बुधवारी सकाळी मागील २४ तासात परभणी तालुक्यात सरासरी ५५.१, गंगाखेड ३१.५, पाथरी ४२.४, जिंतूर ७०.४, पूर्णा ४१.८, पालम ३२.७, सेलू ५७.३, सोनपेठ २४.७, मानवत ४५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

Parbhani Rainfall : सर्वदूर पावसाने पिकांना जीवदान; मोठ्या पावसाची प्रतीक्षाच 

 

 

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!