Jain Muni : जैन मुनींच्या हत्येचा तीव्र निषेध;मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची सेलूतील सकल जैन समाजाची मागणी
सेलू जि.परभणी : कर्नाटकातील हिरगुडी (ता.चिकोडी जि.बेळगाव) येथील परमपूज्य १०८ श्री कामकुमारनंदी महाराज यांच्या अपहरणासह क्रुर पध्दतीने केलेल्या हत्येचा सेलूतील सकल जैन समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणातील मारेकर्यांना त्वरीत अटक करीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. तसेच जैन साधुंना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गुरुवारी , २० जुलै रोजी या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात जैन समाज बांधवांनी निवेदन दिले. सेलू सकल जैन समाजाचे गीताराम कोकणे, रमेशकुमार काला, ॲड.मयूर बिनायके, ललीत बिनायके, विशाल संघई, प्रवीण संघई, वैभव संघई, दिपक बिनायके, महावीर आचलिया, किशोर रूपडा, नरेश काला, आनंद काला, वायकोस, गंगवाल, हेलसकर, आचलिया, मुथा, खोना, कालावाडीया, गादिया, रोहीत काला, अरूणा काला, पुष्पा काला, शोभा बिनायके, रूपाली गंगवाल, सरला काला यांच्यासह जैन समाज पदाधिकारी व बांधवाची उपस्थिती होती. हिरकुडी येथील नंदी पर्वतावर असलेल्या जैन तीर्थावर विराजमान असलेले आचार्य परमपूज्य १०८ श्री कामकुमारनंदी महाराज यांची ५ जुलै रोजी हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील जैन समाजाला दुःख झाले आहे. चातुर्मासाच्या पवित्र दिवसाच्या सुरुवातीला अशा प्रकारची क्रूर घटना म्हणजे अहिंसेच्या मूलतत्त्वाची निर्घृण हत्याच म्हणावी लागेल. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजात तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. कर्नाटक सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन, हत्या करणार्या मारेकर्यांना अत्यंत कठोर शिक्षा करावी. केंद्र व राज्य सरकारने जैन साधूंच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ समस्त सेलू जैन समाजाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले. सकाळी अकरा वाजता श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर व श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व समाजबांधवांनी एकत्रित येवून कर्नाटकातील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच सेलूतील समाज बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. दरम्यान, उप विभागीय कार्यालयचे अव्वल कारकून शहाणे यांना सादर केलेल्या या निवेदनावर सेलू सकल जैन बांधव व महिला सह समाज बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.
जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ समस्त सेलू जैन समाजाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले. सकाळी अकरा वाजता श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर व श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व समाजबांधवांनी एकत्रित येवून कर्नाटकातील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच सेलूतील समाज बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.