Educational : डासाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
तुळजाभवानी अर्बन सोसायटीचा उपक्रम
सेलू : डासाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीतील ४० विद्यार्थ्यांना तुळजाभवानी अर्बन सोसायटीकडून १८ जुलै रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ, अशोक शेजुळ, शाखा व्यवस्थापक बाळासाहेब अनभुले, संजय भंडारी बाळासाहेब मोरे उपस्थित होते यानिमित्ताने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील शिखरे, गजानन गजमल, नाना बोंबले, अनिल गजमल, गोविंदराव गजमल, शिवाजी माने, राजाभाऊ झोल, पांडुरंग कदम, मुख्याध्यापक मधुकर काष्टे उपस्थित होते. सूत्रसंचालन कीर्ती अंबेकर यांनी केले. सदाशिव मुळी यांनी आभार मानले.