चार दिवसांच्या बाळावर बापानेच केले चाकूचे वार

चार दिवसांच्या बाळावर बापानेच केले चाकूचे वार

आरोपी बाप पोलिसांच्या ताब्यात, पिंपळदरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

परभणी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, चार दिवसांच्या चिमुकल्यावर जन्मदात्या बापानेच चाकूने वार केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील गुंडेवाडी (ता.गंगाखेड ) येथे घडली आहे. 

मन हेलावून टाकणारी ही घटना १९ जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पिंपळदरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. व्‍यंकटी कंकरे आरोपीचे नाव आहे.

या बाबत माहिती अशी की आरोपी पती व्यंकटी कंकरे गुंडेवाडी येथे आला असता, पत्नी कल्पना हिला थापड बुक्क्यांनी मारहाण करून व पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन व्यंकटी कंकरे याने चार दिवसांच्या चिमुकल्याच्या पोटावरच्या चाकूने वार केले. त्यामुळे चिमुकल्याच्या पोटातील आतडे बाहेर पडले.

गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कल्पना कंकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश डोंगरे, शिवदास धुळगुंडे, माणिक वाघ यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!