Voter Verification: नवमतदारानों, मतदार यादीत नाव नोंदवा : सेलूचे एसडीओ शैलेश लाहोटी यांचे आवाहन

Voter Verification: नवमतदारानों, मतदार यादीत नाव नोंदवा : सेलूचे एसडीओ शैलेश लाहोटी यांचे आवाहन

मतदार पडताळणी : विविध पक्ष प्रतिनिधी, पत्रकार, महाविद्यालय प्रमुखांची उपस्थिती 

सेलू : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी जाऊन मतदार यादीनुसार मतदारांची पडताळणी करणार आहेत. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन सेलूचे प्रभारी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे.

जिंतूर विधानसभा मतदार संघा अंतर्गत सेलू व जिंतूर तालुक्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच पत्रकार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक शुक्रवारी, २१ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार वसंत पिठले यांची उपस्थिती होती. बीएलओंमार्फत मतदार यादीतील नाव तपासणे, नवमतदारांची नोंदणी, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडणे, कुटुंबातील मृत व्यक्तींची नावे वगळणे, नाव पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये दुरुस्त्या करणे आणि स्थलांतर झाले असल्यास पत्ता बदलून घेणे आदी कामे करण्यात येणार आहेत. तसेच या कामाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी बूथ लेवल एजंटची नेमणूक करून त्यांचे मार्फत जास्तीत जास्त नवीन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले. प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी, अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची जास्तीत जास्त संख्येने मतदारयादीमध्ये नाव नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!