प्राचार्य द.रा.कुलकर्णींच्या ‘निमित्त’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

प्राचार्य द.रा.कुलकर्णींच्या ‘निमित्त’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी लिखित ‘ निमित्त ‘ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी, ३० जुलै रोजी होत आहे.
नूतन विद्यालयाच्या राजेंद्र ब.गिल्डा सभागृहात सकाळी अकरा वाजता हा समारंभ आहे. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.प्रभाकर देव, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार डॉ. आसाराम लोमटे उपस्थित राहणार आहेत. नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि सन्मित्र प्रकाशन समिती यांच्या वतीने आयोजित सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सहसंयोजक अशोक लिंबेकर, अजित मंडलिक यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!