Andolan : जागरूक मतदारांचे सेलूमध्ये आत्मक्लेश आंदोलन 

Andolan : जागरूक मतदारांचे सेलूमध्ये आत्मक्लेश आंदोलन 

सेलू : देशात व राज्यात निर्माण झालेल्या वर्तमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने जागरूक मतदारांनी रविवारी, २३ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन केले.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले. सध्या देशातील व राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. मतदार एका पक्षास निवडून देत आहेत आणि निवडून आल्यानंतर आमदार दुसऱ्याच पक्षात प्रवेश करुन मतदारांचा विश्वासघात करत आहेत. ही सरळ सरळ मतदारांची फसवणूक आहे. जनता अनेक समस्यांना तोंड देत असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्ता उपभोगण्यात मस्त आहे. वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, मणिपुरच्या भगिनींवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, दलितांवरील अत्याचार या साऱ्या घटनांवर आंदोलकांनी या वेळी तीव्र रोष व्यक्त केला. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शेख महेमुद, कॉम्रेड रामकृष्ण शेरे पाटील, रामेश्वर पौळ, ॲड.विष्णू ढोले यांनी विचार मांडले. रामेश्वर उघडे, शेख रहीम, दत्तूसिंग ठाकूर, जाहेद घौरी, जकीसर, सुनील गायकवाड, शेख साजीद, शेख अमजद बागवान, शेख नफीस, बापू धापसे, जावेद घौरी, राजीक कुरैशी, शेख इसाक, शेख एजाज, शेख मुख्तार आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

जनता अनेक समस्यांना तोंड देत असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्ता उपभोगण्यात मस्त आहे. वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, मणिपुरच्या भगिनींवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, दलितांवरील अत्याचार या साऱ्या घटनांवर आंदोलकांनी या वेळी तीव्र रोष व्यक्त केला. 


District Collector : परभणीचे नूतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वीकारला पदभार

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!