Jalna-Nanded Highway : मागण्या पूर्ण होईपर्यंत प्रक्रीयेस स्थगिती द्यावी : आमदार मेघना साकोरे यांचे बांधकाम मंत्री दादा भुसेंना पत्र

Jalna-Nanded Highway : मागण्या पूर्ण होईपर्यंत प्रक्रीयेस स्थगिती द्यावी : आमदार मेघना साकोरे यांचे बांधकाम मंत्री दादा भुसेंना पत्र

 

परभणी : जालना-नांदेड समृध्दी महामार्गावरील शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत महामार्गाच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी जिंतूर – सेलूच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांना २० जुलै रोजी पत्राद्वारे केली आहे.

जालना – नांदेड समृध्दी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या व जमिनीच्या मावेजा बाबत पत्रात सविस्तर नमूद करण्यात आले आहे.मंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की संपादित जमिनीचे वास्तविक बाजारमूल्य ठरविण्यासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणे शासन स्तरावर समिती गठीत करुन खाजगी बाजार (वास्तव बाजार) भावाच्या गुणांक दोन लागू करुन पाच पट मावेजा द्यावा, राष्ट्रीय व राज्य महामार्ग सन्मुख जमिनीस शासनाने गुणक एक लागू केले असून, त्यात २० टक्के कपात केलीआहे. ही अट रद्द करुन सन्मुख जमिनीस गुणांक दोन लागू करुन मावेजा द्यावा, परभणीतील जमिनी गोदावरी नदी, पूर्णा नदी, दुधना नदी पाणलोट क्षेत्राखाली असून, शेतकऱ्यांच्या सात बारावरील पिक पेऱ्याचा, पाण्याचा स्रोत, बोअरवेल, विहीर, कॅनॉल, कमांड एरियाचा विचार करुन जमिनी बागायती धरुन शासनाने बागायतीचा मावेजा द्यावा, बागायतीचा मावेजा देताना जिरायती क्रायटेरिया न वापरता बागायगतीचा क्रायटेरिया वापरुन गुणांक दोन लागू करुन मावेजा देण्यात यावा, शासनाने नविन भूसंपादनासाठी इंटरचेंजची नोटीस जाहीर केली आहे. नवीन होणारा इंटरचेंज हा अत्यंत मोठा असून त्यामध्ये शंभर एकर ते सव्वाशे एकर जमीन संपादित होणार आहे. या इंटरचेंजच्या संपादित जमिनीमुळे मोठया प्रमाणात शेतकरी भूमिहीन होत आहेत व शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पडत आहेत. शासनाने मुख्य रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीमध्येच बीड मधील गेवराई फाटा येथील इंटरचेंजप्रमाणे हा देखील इंटरचेंज तयार करावा. इंटरचेंजसाठी काढलेले नोटीफिकेशन रद्द करावे, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संबंधित महामार्गाच्या प्रक्रीयेस स्थगिती देण्यात यावी.


Jalna-Nanded Highway :  परभणी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी मुंबईकडे रवाना;२६ जुलैपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!