‘पशुवैद्यकीय’च्या विद्यार्थ्यांची परभणीमध्ये निदर्शने

 

‘पशुवैद्यकीय’च्या विद्यार्थ्यांची परभणीमध्ये निदर्शने

परभणी : महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाच्या वतीने राज्यामध्ये खाजगी पशू वैद्यकीय महाविद्यालय विद्यालय स्थापन करण्यासाठी विधान परिषदेमध्ये मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच मापसू हा नवीन तीन वर्षाचा डिप्लोमा करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. याचा विरोध दर्शवित परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी , २८ जुलै रोजी निदर्शने केली. राज्य शासनाने पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अंधारामध्ये ठेवून नवीन डिप्लोमा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

परभणीत ‘माफसू’च्या विद्यार्थ्यांचे बेमुदत बंद आंदोलनखाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला तसेच बारावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा चालू करण्याची घोषणा केली या दोन्ही निर्णयाला महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुडंटस असोशिएशनने विरोध केला आहे. परभणी येथील पशुवैद्यक महाविद्यालय परिसरात शुक्रवारी  जमून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बेमुदत बंद करून प्रचंड घोषणाबाजी केली. शासनाच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात एकत्रित येत ‘माफसू’च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बेमुदत बंद केले आहे.पशुसंवर्धनमंत्र्यांनी यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बारावीनंतरच्या चार वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रमाला मान्यता देण्याचे जाहीर केले आहे. डिप्लोमाधारक हे जनावरांवर उपचार करून शासकीय पदभरतीमध्ये अनेक जागांवरही दावा करतात. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम करणार्‍या विद्यार्थ्यांवर हा अन्याय ठरेल त्यामुळे रिक्त पदे भरावी. ‘डिप्लोमा’ची मान्यता रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!