युवकांनो, जीवन कौशल्येसुद्धा आत्मसात करा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे

युवकांनो, जीवन कौशल्येसुद्धा आत्मसात करा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे

युवकांनो, जीवन कौशल्येसुद्धा आत्मसात करा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे

परभणी येथील शारदा महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

परभणी : काळ प्रचंड वेगाने बदलत आहे, युवकांनी करिअरच्या वाटा वेळेची निश्चित करा आणि ज्ञानासोबत जीवन कौशल्येसुद्धा आत्मसात करण्याचीही नितांत गरज निर्माण झाली आहे, याची सतत जाणीव ठेवा, असे मत परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी शुक्रवारी, २८ जुलै रोजी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व परभणी येथील शारदा महाविद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.काळे बोलत होते. सिनेट सदस्य नारायण चौधरी, प्रभारी प्राचार्य शामसुंदर वाघमारे, डॉ.समितीचे प्रा.डॉ.सुनील बल्लाळ, प्रा.डॉ.शाम पाठक प्रा.डॉ.यु.एस जगताप, प्रा.डॉ.अविनाश पांचाळ, अमृता जोशी, प्रल्हाद लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मोबाईल संदेश पडताळणी न करता, पुढे पाठवणाऱ्या संस्कृतीपासून सावध राहा, देशाचा व स्वतःचा विचार करुन आनंदी जीवन जगा, वाचन संस्कृती जोपासा, स्पर्धेच्या एकविसावे शतकात टिकून राहावयाचे असेल, तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून स्वतःला परीक्षेच्या दृष्टीने सर्वस्तरावर सदैव‌ अपडेट राहावे लागेल, असेही डॉ.काळे यांनी या वेळी नमूद केले. प्रा.डॉ.श्यामसुंदर वाघमारे, गजानन चौधरी यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक वर्ष २००-२१ मध्ये बीए, बीकॉम, बीएसएसी, बीसीए, एमए उत्तीर्ण विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजव झाले. विद्यापीठ गीत लिंबेकर यांनी सादर केले.
प्रास्ताविक डॉ.रत्नाकर कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.एच.डी.शेवाळे यांनी केले. डॉ.सुनील बल्लाळ यांनी आभार मानले. यावेळी विविध अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.एस.एफ.खडके ,प्रा. डॉ.डी.बी.मुंढे, प्रा.डॉ.कलीमुद्दीन काझी, प्रा.डॉ.नूरुलामीन सय्यद, प्रा.डॉ.नवनाथ सिंगापुरे, प्रा.डॉ.नितीन बावळे, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश जयपूरकर, प्रकाश काळे, श्रीधर पांढरकर, भगवान रिठाड, सुनंदा राजगुरु, शेख जावेद, तुकाराम पवार, तनुजा रासवे, लिलाबाई गायकवाड, राजाराम मूत्रटकर यांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!