Brhmakumaries : डॉक्टरांच्या उद्बोधन कार्यशाळेला परभणीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणीतील ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम
परभणी : येथील शिवरामनगरातील प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वैद्यकीय प्रभागद्वारा रविवारी, ३० जुलै रोजी ‘हार्मनी इन रिलेशनशिप’ विषयावरील उद्बोधन कार्यशाळेला परभणी शहरातील डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या ब्रह्माकुमारी डॉ.डोनिका बहेन, तसेच परभणी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी अर्चना बहेन, ब्रह्माकुमारी बैष्णवी बहेन, रूपाली बहेन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेवानिवृत्त, डॉ.प्रभा अंतवाल, डॉ.बी.के.कारले, डॉ जी.एम.चांडक, डॉ.ए.एल.शेळके शैक्षणिक सल्लागार जयंत गाढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.डोनिका यांनी पावर पॉईंट प्रेझेन्टेशनव्दारे, नातेसंबंधामध्ये सद्भावना जागृतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, एकमेकांचे अवगुण-दोष पाहण्याऐवजी गुण पाहावे, ते ग्रहण करावे, एकमेकांच्या विचारांना समजून घ्यावे, योग्य तो आदर- सत्कार करावा, एकमेकांच्या विशेषतांची आणि चांगल्या कार्याची यथायोग्य मनापासून स्तुती करावी, आपापसांत स्नेह, प्रेम,जिव्हाळा, विश्वास वृद्धिंगत व्हावा. जेणेकरून गैरसमज, शत्रूत्व, ईर्ष्या, व्देष संपुष्टात येईल. डॉ.डोनिका पुढे म्हणाल्या की, परमोच्च शक्ति परमात्म्याच्या सोबत मन, बुद्धी जुळवून, स्वतःमधील सकारात्मकता वाढवण्यासाठी थोडा थोडा वेळ काढून राजयोग ध्यानाभ्यास सर्वांनी अवश्य करावा. या वेळी प्रात्यक्षिक अनुभूति देखील सर्वांकडून करवून घेण्यात आली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांच्या मनातील शंकांचे निरसन डॉ.डोनिका बहेन यांनी केले. प्रारंभी दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. ईश्वरीय स्तूती गीत सादर झाले. ईश्वरीय भेट देऊन उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक ब्रह्माकुमारी अर्चना बहेन यांनी केले. कल्पना बहेन (बोरी) यांनी ब्रहमाकुमारी विद्यालयाच्या कार्याचा परिचय दिला. सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी सीमा बहेन यांनी केले, तर ब्रह्माकुमार डॉ.शिवदास शिंदे (एरंडेश्वर) यांनी आभार मानले ब्रह्माभोजनाने कार्यशाळेची सांगता झाली. होमिओपॅथी कॉलेजसह शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांची, तसेच ब्रह्माकुमारी परिवारातील भाई, बहेन, माताजी आदींची कार्यशाळेला उपस्थिती होती
एकमेकांचे अवगुण-दोष पाहण्याऐवजी गुण पाहावे, ते ग्रहण करावे, एकमेकांच्या विचारांना समजून घ्यावे, योग्य तो आदर- सत्कार करावा, एकमेकांच्या विशेषतांची आणि चांगल्या कार्याची यथायोग्य मनापासून स्तुती करावी, आपापसांत स्नेह, प्रेम,जिव्हाळा, विश्वास वृद्धिंगत व्हावा. यासाठी परमोच्च शक्ति परमात्म्याच्या सोबत मन, बुद्धी जुळवून, स्वतःमधील सकारात्मकता वाढवण्यासाठी थोडा थोडा वेळ काढून राजयोग ध्यानाभ्यास सर्वांनी अवश्य करावा, असे ब्रह्माकुमारी डॉ.डॉ.डोनिका बहेन यांनी यावेळी सांगितले.
समानतेच्या संधीतूनच मुलींच्या उत्कर्षाला मिळेल बळ : न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांचे मत;