हेमराज जैन यांचे कार्य दिशादर्शक : विधीज्ञ अशोक सोनी; जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त परभणीमध्ये कार्यक्रम 

Nanaji Deshmukh : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य : कृषी मंत्री धनंजय मुंडे

हेमराज जैन यांचे कार्य दिशादर्शक : विधीज्ञ अशोक सोनी; जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त परभणीमध्ये कार्यक्रम 

परभणी : मराठवाडा व परभणीच्या विकासासाठी आयुष्यभर लढा देणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि ज्यांनी मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटीची धुरा समर्थपणे पेलली, असे शिक्षणतज्ज्ञ हेमराज जैन यांना स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी विविध स्तरांतून आदरांजली वाहण्यात आली. 

शारदा महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात जेष्ठ विधीज्ञ अशोक सोनी यांनी हेमराज जैन यांच्या शैक्षणिक कार्य व मराठवाड्यातील विविध आंदोलनातील कार्याचा आढावा घेत, त्यांच्या दिशादर्शक कार्याचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे नमूद केले. झेड.आर.मुथा यांनी हेमराज जैन यांच्या सामजिक सांस्कृतिक कार्याबद्दल महिती दिली. हेमराजजींचा आदर्श समोर ठेवून प्रगती करूया, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्याध्यापक नामदेव सूर्यवंशी, अशोक मुथा, रुस्तुम कदम, प्रदीप गोलेच्छा, बारबिंड, अनिल जैन, सुनील जैन, निखिल जैन, आदित्य जैन, जैन कुटुंबीय, शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक नितिन जैस्वाल, प्राचार्य संजय जोशी, प्रभारी प्राचार्य डॉ.शामसुंदर वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित मातेकर यांनी केले.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!