Linking : युरिया खताची सेलूत कृत्रिम टंचाई; काळाबाजार रोखण्याची शेतकऱ्यांची मागणी
सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
परभणी : सध्या खरीपाचा हंगाम चालू असून, पेरणी पूर्ण झालेली आहे. पिकांच्या मशागतीचे, वारणीसाठीआदी कामे चालू आहेत. कृषी विभागातर्फे खते, औषधी विक्रीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना, ऐन मोसमामध्ये युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत, असून काळाबाजार राजरोसपणे चालू आहे, असा आरोप सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आला आहे.
यासंदर्भात गुरुवारी, ३ ऑगस्ट रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. युरिया खतासोबत शेतकऱ्यांना आवश्यक नसलेले औषध घेण्यास व्यापारी सक्ती करीत आहेत.राजरोसपणे लिकिंग चालू असताना तालुका कृषी अधिकारी, बाजार समितीचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी या संदर्भात आपणाकडे निवेदन देण्यात आले होते.
या प्रकारांमुळे विनाकारण शेतकऱ्यांची लुटमार होत आहे. या प्रकाराने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाढीव दराने विक्री युरिया खताची होत आहे. याकडे तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे. त्याचा काळाबाजार व लिकिंग ताबडतोब थांबवावी. या बाबत कृषी विभागाचे तपासणी पथक नेमावे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदक ॲड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, गुलाब पौळ, लिंबाजी कलाल, नारायण पवार, दिलीप शेवाळे, राजेंद्र केवारे, इसाक पटेल, सतिहा काकडे, विलास करोडगे, उत्तम गवारे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, दत्तराव कांगणे, रामचंद्र आघाव, उमेश काष्टे, योगेश सूर्यवंशी, मतीन दादामिया, अजित मंडलिक, रौफभाई, मुकुंद टेकाळे, परमेश्वर कादे, दिलीप मगर, देवराव दळवे. मगर, विठ्ठल काळे आदींच्या सह्या आहेत.