शहीद अनंत लेवडे यांना अभिवादन; सेलूतील डिग्रसवाडी पाटीवर कार्यक्रम
सेलू जि.परभणी : मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील डिग्रसवाडी येथील शहीद अनंत सुंदरराव लेवडे यांच्या पाचव्या पुण्यस्मृती निमित्त शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी सेलू येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी जयसिंग शेळके, मराठा क्रांती मूक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, प्रसाद महाराज काष्टे, बाळू लेवडे, जयराम सोळंके, उद्धव भुजबळ, संतोष निर्वळ, गणेश भागवले, मोहन यादव, आसाराम होगे, राहुल गाडेकर, नारायण परभने, ज्ञानेश्वर होगे ,सुनील कदम, कृष्णा कदम, ओम शेरे, शुभम शेरे, भगवान शेरे, विठ्ठल निर्वळ, एकनाथ होगे, सुधाकर होगे, दत्ता नवल, राम परभने, गोविंद निर्वळ, अजय बागवले,अंकुश होगे, भागवत गाडेकर, कुमार गांजकर आदींची उपस्थिती होती.
Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ