परभणीमध्ये भरणार ‘सैनिक दरबार’ : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांची ग्वाही, सेलूतील प्रलंबित प्रकरणांचा २४ तासांत निपटारा
महसूल सप्ताह : सेलूतील माजी सैनिकांच्या सात वर्षापासून प्रलंबित प्रकरणांचा २४ तासांत निपटारा
परभणी : आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांच्या सर्व समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर, आता दर तीन महिन्याला ‘सैनिक दरबार’ भरवण्यात येईल, अशी ग्वाही अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) दिली.
महसूल व वन विभागाच्या वतीने महसूल सप्ताहानिमित्त आयोजित ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या विशेष कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी डॉ.काळे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार सुरेश घोळवे, डॉ.अमित घाडगे, वसंत निकम, प्रशांत वाकोडकर, शेख वसीम यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा देश सैनिकांमुळेच सुरक्षित आहे. विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे सैनिकांच्या सैनिकांच्या कल्याणाच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. माजी सैनिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर तातडीने पत्रव्यवहार करण्यात येईल, असे डॉ काळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सैनिकांचे अल्प आणि दीर्घकालीन प्रश्न, समस्या अशा दोन गटामध्ये वर्गीकरण करता येईल. अल्पकालीन समस्या सोडवण्यासाठी तहसीलदारांकडे विशेष एक दिवस ठेवला जाईल, असे दत्तु शेवाळे यांनी सांगितले. या वेळी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी व वीर माता-पिता यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सैनिक कल्याण विभागाद्वारे सैनिक, विधवा, पत्नी यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.काळे यांनी आदेश दिल्यानंतर सेलू येथील माजी सैनिकांच्या सात वर्षापासून प्रलंबित जमिनीविषयक प्रकरणाचा निपटारा २४ तासात करून सातबारा देण्यात आला. माजी सैनिक अशोक आयनिले, काशीराम पौळ, विश्वनाथ सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले. तर डॉ.अमित घाडगे यांनी आभार मानले.
सैनिकांच्या अल्पकालीन समस्या सोडवण्यासाठी तहसीलदारांकडे विशेष एक दिवस ठेवला जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे यांनी सांगितले. या वेळी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी व वीर माता-पिता यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सैनिक कल्याण विभागाद्वारे सैनिक, विधवा, पत्नी यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.काळे यांनी आदेश दिल्यानंतर सेलू येथील माजी सैनिकांच्या सात वर्षापासून प्रलंबित जमिनीविषयक प्रकरणाचा निपटारा २४ तासात करून सातबारा देण्यात आला.
Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ