LIC : सेलू एलआयसी शाखेमध्ये चाटे, बोराडे यांचा सत्कार
सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेच्या कर्मचारी अरुण चाटे व कृष्णा बोराडे यांचा शुक्रवारी, चार ऑगस्ट रोजी स्वागत सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी शाखा प्रबंधक संतोष कोडगिरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अरुण नंदनकर उपस्थित होते. सेलू शाखेतील अरुण चाटे यांची परभणी येथे बदली, तर हिंगोली येथून कृष्णा बोराडे यांची सेलू येथे नियुक्ती झाल्याबद्दल हा स्वागत सत्कार सोहळा आयोजिण्यात आला होता. या वेळी अरूण नंदनकर, योगेश जयभाय, अविनाश जोशी, शमशोदीन शेख, भास्कर हिप्परगे, उपेंद्र बेल्लुरकर, मन्मथ देवढे, किरण गुंडेकर,संपत कपाळे, गोपाळ गाडगे, शिवाजी अघाव, यांनी मनोगत व्यक्त केले. अजय पुंडलिक, श्रीपती जगताप, भालचंद्र बरडे, शुभम जोशी भारत कोलते, अमर पाटील, संपत कपाळे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवणे, संदिप जाधव, अमिर शेख, गजानन वाकडीकर, नितीन भिसे, गोविंद कारके आदी उपस्थित होते.