डॉ.संजय रोडगे यांच्या कार्याचा रासपच्या महादेव जानकरांकडून गौरव; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम
धनगर समाजातील गुणवंतांचा सत्कार, मान्यवरांची उपस्थिती
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी डॉ.संजय रोडगे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा जानकरांनी गौरव केला.
विद्याविहार संकुल येथे शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे आदींसह राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी महादेव जानकर म्हणाले की, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या भौतिक सोयीसुविधा या ठिकाणी दिल्या जातात. उत्कृष्ट प्रकारची भोजन व निवास व्यवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये कृतीयुक्त शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येतो, यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक व बौद्धिक विकास होतो. धनगर समाजातील विद्यार्थी इतर समाजाच्या तुलनेत अशा पद्धतीचे शिक्षण घेण्यात मागे राहणार नाहीत. याबद्दलचा आत्मविश्वास जानकर यांनी व्यक्त केला. दर्जेदार शिक्षण व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.रोडगे यांची प्रशंसा केली. याप्रसंगी संस्थेतील शिक्षक, कर्मचारी व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये कृतीयुक्त शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येतो, यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक व बौद्धिक विकास होतो. धनगर समाजातील विद्यार्थी इतर समाजाच्या तुलनेत अशा पद्धतीचे शिक्षण घेण्यात मागे राहणार नाहीत. याबद्दलचा आत्मविश्वास महादेव जानकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.