Amrit Bharat Station : सेलूतील भूमिपूजन सोहळा रंगला; सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक
आमदार मेघना बोर्डीकरांसह मान्यवरांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत सेलू येथील पुनर्विकासकामांना रविवारी, ६ ऑगस्ट रोजी उत्साहात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने फलकाचे अनावरण झाले. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर बोर्डीकर, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, रेल्वेचे नोडल अधिकारी बी.हेमा नायक, मुख्याधिकारी देविदास जाधव, नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड, प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, शशिकांत देशपांडे, वरिष्ठ अभियंता शिवय्या मुखेरी, मुख्य तिकीट निरीक्षक प्रदीप जोहिरे, नियंत्रक विजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आमदार बोर्डीकर तसेच मान्यवरांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.
या निमित्ताने न्यू हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. रेल्वे विभागाच्या वतीने “देश आणि रेल्वेमध्ये काय चालले आहे?” या विषयावर आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन या वेळी गौरविण्यात आले. नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संतोष पाटील, यशवंत विद्यालयाचे जी.बी.सातपुते, न्यू हायस्कूलचे शेषराव नागरे, तसेच मनिषा बोराडे यांच्याही सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन चव्हाण यांनी केले. रेल्वे स्टेशन मास्तर सोमनाथ राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रवासी संघाचे पदाधिकारी, रेल्वेचे कर्मचारी व विविध स्तरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
विजेत्यांची नावे अशी : निबंध स्पर्धा : ज्ञानेश्वर किशोर मोगल, वैष्णवी विष्णू पवार, अक्षय हरिभाऊ आंभुरे, अंजली अनंतराव लोणकर, श्रद्धा सर्जेराव मोगल, अद्वैत अतुल पाटील
चित्रकला स्पर्धा : श्रुती अशोक सोनटक्के, पौर्णिमा मारोती गायकवाड, रोशनी राजू ढेंबरे, लक्ष्मी रंगनाथ राऊत, सृष्टी रामराव घुमरे, सौरभ बालासाहेब मगर, वक्तृत्व स्पर्धा : अंजली शिवाजी नाटकर, रोशनी राजू ढेंबरे, श्रुती अशोक सोनटक्के, अश्वीनी संजय रणखांबे, पायल अंकुश राऊत, दुर्गा नामदेव मगर