माझी माती, माझा देश अभियान प्रभावीपणे राबिवणार : आमदार मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन 

Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

माझी माती, माझा देश अभियान प्रभावीपणे राबिवणार : आमदार मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन 

जिंतूरातील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर, ज्ञानोपासक महाविद्यलयात कार्यक्रम 

परभणी : जिंतूर येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयात व ज्ञानोपासक महाविद्यलयात आझादीच्या अमृतमहोत्सव निमित्त आयोजित ‘माझा माती माझा देश’ या कार्यक्रमाचे मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, माझी माती, माझा देश अभियान जिल्हाभरात प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे.”

अध्यक्षस्थानी डॉ.पंडित दराडे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास मुटकुळे, प्राचार्य भोंबे , खंडेराव भिसे, स्वाती डाके यांची उपस्थिती होती.‌ आमदार मेघना बोर्डीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विविध विकास कामांविषयी माहिती दिली. आगामी रेल्वे स्टेशन, येलदरी येथे युद्धपातळीवर होत असलेला अभूतपूर्व नवीन पूल याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान मोदी हे भारतासाठी का हवे आहेत ? हे सांगताना त्यांच्या वेगवेगळ्या विकास कामांवर चर्चा केली तसेच; त्यांच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीवरही भाष्य केले. पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने मीही अठरा -अठरा तास माझ्या बांधवांसाठी काम करते आहे. हे काम करण्याची संधी आपण आणि आपल्या परिवारांमुळेच मला मिळाली आहे. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच भविष्यात वेगवेगळ्या विकास योजना राबवून जिल्ह्याचा विकास साधण्याचे माझे स्वप्न आहे. त्याला आकार देण्यासाठी तुमचीही अमूल्य अशी मदत मला लागणार आहे. मातृभूमीसाठी आपल्याला एकजुटीने पुढे जावे लागेल. देशाच्या संरक्षण खात्याच्या बळावर आपण निंश्चित आहोत, त्यांच्याप्रतीही आपण संवेदना व्यक्त केली पाहिजे. देशाचा सन्मान राखण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम आपल्याला यशस्वीपणे राबवायची आहे. असे सांगून आमदार बोर्डीकर यांनी मातृभूमीसाठी माती हातात देऊन सगळ्या विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या लक्षवेधी प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन प्रा.गजभरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. वर्णेकर, प्राध्यापक माकोडे, घुगे, सोमानी, मते, तळेकर, इंगळे, वाघ, लोणे, घुगे, प्रादाबे, शिंदे, गणपुरकर, काझी, सोळंके, सोपान घोडे आदींनी परिश्रम घेतले.

माझी माती, माझा देश अभियान प्रभावीपणे राबिवणार : आमदार मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!