पिंपळगाव तांडा येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार; माजी आमदार विजय भांबळे यांची उपस्थिती
भाजप सदस्यांचाही विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिनशर्त पाठिंबा
जिंतूर : तालुक्यातील पिंपळगाव तांडा (का) येथील सरपंचपदी लीलाबाई ज्ञानदेव चव्हाण, तर उपसरपंचपदी बबन हरिसिंग राठोड यांची नव्याने निवड झाली. या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयामध्ये माजी आदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यचा जाहीर सत्कार करण्यात आला. पिंपळगाव तांडा (का) ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असून, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम आहे. यात राष्ट्रवादीचे पाच सदस्य असून माजी आमदार भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गीताबाई किशन राठोड या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्य यांनी बिनशर्त पाठींबा दिला. या वेळी विश्वनाथ राठोड, सदस्य उत्तम लालसिंग राठोड, सरस्वती रामकिशन राठोड, गीताबाई किशन राठोड, ज्योती रवी पवार यांच्यासह विकास पवार, विष्णू चव्हाण, भाऊ राठोड, राजेश पवार, कोंडीराम राठोड, राजेश चव्हाण,राजेश राठोड, आणील राठोड आदींची उपस्थिती होती.