Be Positive : सकारात्मक चिंतनासाठी राजयोग ध्यानाभ्यासाची गरज : बी.के.सीमा दीदी

Be Positive : सकारात्मक चिंतनासाठी राजयोग ध्यानाभ्यासाची गरज : बी.के.सीमा दीदी

परभणीतील युवकांसाठी उदद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन, ब्रह्माकुमारी विद्यालयाचा उपक्रम

परभणी : शिवराम नगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या युवा प्रभागव्दारे पाच ऑगस्ट रोजी युवकांसाठी उदद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य वक्ता म्हणून हडपसर (पुणे) सेवाकेंद्र संचालिका बी.के.सीमा दीदी, समुपदेशक प्राध्यापक रफीक शेख, संघर्ष करियर अकॅडमीचे संचालक जव्हार, वन अधिकारी प्रकाश शिंदे, परभणी सेवाकेंद्र संचालिका बी.के.अर्चना दीदी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

युवा- वर्गाला मार्गदर्शन करतांना सांगितले कि जीवनाचे लक्ष्य निर्धारित केल्यानंतरच तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात सकारात्मक चिंतनासाठी राजयोग ध्यानाभ्यासाची आवश्यकता गरजेची आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती प्रात्यशिकाव्दारे उपस्थितांकडून करवून घेतली. शैक्षणिक सल्लागार तथा समुपदेशक प्राध्यापक रफीक शेख यांनी उपस्थितांना डिजीटल वेलनेसबद्दल (digital wellness) मार्गदर्शन केले. डिजीटल मिडियाचा (digital media) अतिरेकी वापर घातक ठरू शकतो, याविषयी जागरूकता निर्माण करत पुस्तक वाचनाकडे प्रेरित होण्यास सर्वांना आवर्जून सांगितले. संयोजक बी.के.अर्चना दीदी यांनी प्रास्ताविक तसेच उपस्थित मान्यवरांचे ईश्वरीय भेटवस्तू देऊन स्वागत केले. बी.के.रुपालीदीदी, बी.के.वैष्णवी दीदी यांनीही स्वागत केले. प्रारंभी मान्यवरांच्या आणि युवा प्रतिनिधींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून युवा उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. पावर पॉईन्ट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून मुख्य वक्ता बी.के.सीमा दीदीजी यांनी युवावर्गाकडून प्रेरणादायी ठरणारे सकारात्मक संकल्प करवून घेतले. मेडीटेशन अनुभूतीव्दारे कार्यक्रमाची सांगता झाली. बी.के.शामल दीदी (पुणे) यांच्या हस्ते वरदान कार्ड आणि प्रसाद वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन बी.के.सीमा दीदी यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील युवक व युवतींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.


पगार राष्ट्रीयकृत बॅंकेतूनच करा : परभणी जिल्ह्यातील खासगी शाळांतील शिक्षकांची मागणी

Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!