Crop Loan : पावसाअभावी शेतकरी संकटात; विनाविलंब पीककर्ज तात्काळ वाटप करा: आमदार मेघना बोर्डीकरांच्या अधिकार्‍यांना कडक सूचना

Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

Crop Loan : पावसाअभावी शेतकरी संकटात; विनाविलंब पीककर्ज तात्काळ वाटप करा: आमदार मेघना बोर्डीकरांच्या अधिकार्‍यांना कडक सूचना

सेलू तहसील कार्यालयात पीककर्ज आढावा बैठक

सेलू : येथील तहसील कार्यालयात आमदार मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पिक कर्ज आढावा बैठक झाली.‌ सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अजुन मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात आहेत. अशा वेळी बॅंकानी जास्त आढेवेढे न घेता व वेळ न दडवता पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज उपलब्ध करुन दिले पाहिजे

तहसील कार्यालयात गुरूवारी , १० ऑगस्ट रोजी पीककर्ज वाटप आढावा बैठक झाली. या वेळी विविध बॅंक पीक तसेच प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. कर्ज उद्दिष्ट वाटप शंभर टक्के करावे. पीक कर्जाची पद्धत सोपी करून शेतकर्‍यांना कमीत कमी कागदपत्रात कर्ज वाटप चालू करावे व टार्गेट प्रमाणे कर्ज वाटप पूर्ण करावे. पात्र शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही. आपल्या बँकेकडील पूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून फेरफार नक्कल घेऊ नये. अशा सूचना आमदार मेघना बोर्डीकर यांनी या वेळी दिल्या.‌ त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ सुरु आहे. कापूस, सोयाबीन,मका आदी पिके शेतकरी घेत आहेत. त्यांना आवश्यक असणारे खरीप पिकाचे कर्ज बँकांनी शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन तात्काळ मंजूर करावे, अशा सूचनादेखील दिल्या. आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळया बँकांकडे खरीप पीक कर्ज प्रस्ताव दाखल केलेले आहेत. जिल्ह्यातील बँकांनी त्या प्रस्तावास तात्काळ मान्याता द्यावी. शिवाय सर्व बँकांनी बैठकीस येताना परिपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचनाही आमदार मेघना बोर्डीकर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास हलगर्जीपणा करतील त्याची गंभीरपणे दखल घेण्यात येईल व त्यामुळे शेतकरी संतप्त झाला तर त्यांना बँक शाखा अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा दिला. या वेळी उपविभागीय अधिकारी जीवन डाफकर, तहसीलदार, गटविकास अधिकारी, बाजार समिती संचालक डॅा.संजय रोडगे, ॲड दत्ता कदम, रवीद्र डासाळकर ,जयसिंग शेळके, अजय डासाळकर, सर्व बॅंकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून फेरफार नक्कल घेऊ नये. अशा सूचना आमदार मेघना बोर्डीकर यांनी या वेळी दिल्या.‌ त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ सुरु आहे. कापूस, सोयाबीन,मका आदी पिके शेतकरी घेत आहेत. त्यांना आवश्यक असणारे खरीप पिकाचे कर्ज बँकांनी शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन तात्काळ मंजूर करावे, अशा सूचनादेखील दिल्या. आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळया बँकांकडे खरीप पीक कर्ज प्रस्ताव दाखल केलेले आहेत. जिल्ह्यातील बँकांनी त्या प्रस्तावास तात्काळ मान्याता द्यावी.


पिंपळगाव तांडा येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार; माजी आमदार विजय भांबळे यांची उपस्थिती

पगार राष्ट्रीयकृत बॅंकेतूनच करा : परभणी जिल्ह्यातील खासगी शाळांतील शिक्षकांची मागणी

Swatantryaveer : सावरकरांची विचारधारा कोणीही संपवू शकणार नाही : जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे मत

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!